शेवटची उजळणी केल्याची तारीख: सप्टेंबर 26, 2014
DRAGON DICTATION अंतिम उपभोगता परवाना करारासहित SWYPE
तुम्ही (SWYPE आणि/ किंवा DRAGON DICTATION ऍप्लिकेशन्स वापरणारी व्यक्ती किंवा संस्था) आणि NUANCE COMMUNICATIONS, INC. ("NUANCE") यांच्यामधील हा एक कायदेशीर करार आहे. कृपया खालील अटी काळजीपूर्वक वाचा.
SWYPE सॉफ्टवेअर आणि/ किंवा DRAGON DICTATION सेवा स्थापित करण्यासाठी आणि वापरण्यासाठी तुम्ही या अंतिम उपभोगता परवाना कराराच्या ("करार") अटी मान्य केल्याच पाहिजेत. "ऍक्सेप्ट [मान्य आहे]" या बटनावर क्लिक करून, तुम्ही या कराराच्या अटींशी बांधील असल्याचे मान्य करता. तुम्ही या अटी आणि शर्ती मान्य केल्याशिवाय तुम्ही SWYPE सॉफ्टवेअर किंवा DRAGON DICTATION सेवा कोणत्याही प्रकारे वापरू शकत नाही.
SWYPE सॉफ्टवेअर आणि DRAGON DICTATION सेवा यामध्ये काही विशिष्ट ग्राहक/ सर्व्हर ऍप्लिकेशन्स आहेत ज्यामुळे उपकरणांच्या उपभोगतांना टेक्स्ट इन्पुट आणि स्पोकन कमांड्सद्वारे, मजकूर आणि ईमेल संदेश तयार करण्याच्या क्षमते समावेशासहित परंतु त्यापर्यंत मर्यादित नाही, अशा उपकरणांची काही विशिष्ट कार्ये नियंत्रित करणे शक्य होते. खालील सामान्य अटी आणि शर्तींमुळे, NUANCE आणि त्यांचे पुरवठादार तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतील असे कोणतेही अतिरिक्त SWYPE सॉफ्टवेअर ("सॉफ्टवेअर"), जे टेक्स्ट इन्पुट मोडॅलिटी पुरवते आणि एखाद्या NUANCE सुविधेमध्ये स्थापित केलेल्या DRAGON DICTATION सर्व्हर ऍप्लिकेशन्स ("सेवा") पर्यंत पोचण्याची उपभोगतांना परवानगी देते, आणि सॉफ्टवेअर वापरण्यासाठीची आणि सेवांपर्यंत पोचण्यासाठीची NUANCEने पुरवलेली सोबतची कागदपत्रे यांच्या समावेशासहित तुम्हाला the SWYPE सॉफ्टवेअर डाऊनलोड, स्थापित करण्याची आणि वापरण्याची परवानगी मिळते.
1. परवाना देणे. केवळ NUANCE आणि त्यांचे पुरवठादारांनी उपलब्ध करून दिलेल्याच सॉफ्टवेअर आणि सेवेतील देशांमध्ये आणि भाषांमध्ये एका एकमेव उपकरणावर सॉफ्टवेअर स्थापित करण्यासाठी आणि वापरण्यासाठी, आणि अशा उपकरणावर सॉफ्टवेअरद्वारे सेवेपर्यंत पोचण्यासाठी NUANCE आणि त्यांचे पुरवठादार तुम्हाला ("परवानाधारक"), फक्त ऑब्जेक्ट कोड स्वरूपात एक वैयक्तिक, अ-विशिष्ट, हस्तांतरित न करता येण्याजोगा, दुसऱ्याला परवाना न देता येण्याजोगा, रद्द करता येण्याजोगा मर्यादित परवाना देतात. "उपकरण" म्हणजे http://www.nuancemobilelife.com, येथे असणाऱ्या आणि वेळोवेळी Nuance द्वारे अद्ययावत केले जाऊ शकणाऱ्या Nuance संकेतस्थळावर वर्णन केल्याप्रमाणे असलेले अधिकृत भ्रमण उपकरण. तुम्ही पुढे स्वीकारता आणि मान्य करता की NUANCE अतिरिक्त सॉफ्टवेअर डाऊनलोड्स उपलब्ध करून देऊ शकतात, ज्यात भाषा, कीबोर्ड, किंवा शब्दकोश यांचा समावेश आहे परंतु केवळ त्यांच्यापुरता मर्यादित नाही, आणि तुम्ही याआधीच पुरवलेल्या सॉफ्टवेअरसह अतिरिक्त सॉफ्टवेअर डाऊनलोड्स वापरू शकता, आणि अशा अतिरिक्त सॉफ्टवेअर डाऊनलोड्सचा तुमचा वापर या कराराच्या अटी आणि शर्तींच्या अधीन आहे. तुम्ही पत्करलेल्या आणि एखाद्या तृतीय पक्षाने (म्हणजेच, Google, Amazon, Apple), जे तुमचे डाऊनलोड आणि तुमचा सॉफ्टवेअर व सेवा यांच्या वापरासंबंधित वेळोवेळी बदलू शकते, तुमच्याकडून मागीतलेल्या कोणत्याही शुल्कांसाठी तुम्ही जबाबदार आहात. या करारात दिल्याप्रमाणे सॉफ्टवेअर किंवा सेवेच्या तुमच्या वापरासाठी अशा तृतीय पक्षाला दिलेल्या कोणत्याही रकमा परत करण्याचे NUANCEवर बंधन नाही. तुम्ही पुढे स्वीकारता आणि मान्य करता की माहिती पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी सॉफ्टवेअर आणि सेवा तुमचे बिनतारी नेटवर्क वापरेल, आणि तुमचा मोबाईल ऑपरेटर आणि इतर तृतीय पक्षसॉफ्टवेअर आणि सेवा एअरटाईम, माहिती आणि/ किंवा वापरासाठीचे शुल्क तुमच्याकडून मागू शकतात.
2. परवानाधारकाच्या जबाबदाऱ्या.
2.1. निर्बंध. तुम्ही (कायाद्याने परवानगी असल्याशिवाय): (अ) NUANCEने लेखी स्वरूपात मान्यता दिल्याशिवाय सॉफ्टवेअर किंवा सेवेविषयीचे कोणतेही स्वयंचलित किंवा रेकॉर्ड केलेले प्रश्न सादर करू शकत नाही; (ब) सॉफ्टवेअर आणि सेवा तुमच्या स्वतःच्या वापराव्यतिरिक्त वापरू शकत नाही; (क) सॉफ्टवेअरद्वारे किंवा सॉफ्टवेअरशिवायच्या इतर मार्गांद्वारे सेवेपर्यंत पोचू शकत नाही; (ड) या सॉफ्टवेअरच्या संपूर्णरित्या किंवा अंशतः प्रती करू शकत नाही, ते पुन्हा निर्माण करू शकत नाही, ते वाटून देऊ शकत नाही, किंवा इतर कोणत्याही मार्गाने त्याच्या नकला करू शकत नाही; (ई) सॉफ्टवेअर किंवा सेवेतील कोणतेही अधिकार, संपूर्णरित्या किंवा अंशतः विकू शकत नाही, भाड्याने देऊ शकत नाही, त्यांचा परवाना देऊ शकत नाही, त्यांचा उप-परवाना देऊ शकत नाही, ते वाटून देऊ शकत नाही, नेमू शकत नाही, हस्तांतरित करू शकत नाही किंवा परवानगी देऊ शकत नाही; (फ) सॉफ्टवेअर किंवा सेवा बदलू शकत नाही, पोर्ट करू शकत नाही, भाषांतरित करू शकत नाही, किंवा व्युत्पत कामे तयार करू शकत नाही; (ग) सॉफ्टवेअर किंवा सेवेचा कोणताही मूळ कोड, मूलभूत कल्पना, किंवा अल्गोरिदम मोडण्याचा, काढण्याचा, उलट जुळवण्याचा किंवा अन्यथा कोणत्याही मार्गाने साध्य करण्याचा, पुन्हा रचण्याचा, ओळखण्याचा किंवा शोधण्याचा प्रयत्न करू शकत नाही; (h) सॉफ्टवेअरमधून कोणतेही मालकी सूचना, लेबल किंवा खुणा काढू शकत नाही; किंवा (i) तृतीय पक्षांनी उपलब्ध करून दिलेल्या उत्पादनांशी किंवा सेवांशी तुलना करण्याच्या किंवा त्यांच्या विरोधात बेंचमार्किंग करण्याच्या हेतूनेसॉफ्टवेअर किंवा सेवा वापरू शकत नाही.
3. मालकी हक्क.
3.1. सॉफ्टवेअर आणि सेवा. NUANCE आणि त्यांचे परवाना देणारे यांच्याकडे सॉफ्टवेअर आणि सेवेचे सर्व अधिकार, पदवीहक्क, आणि हितसंबंध आहे, ज्यात सर्व पेटंट, लेखाधिकार(copyright), व्यापारी गुपीते, ट्रेडमार्क आणि त्याच्याशी निगडित इतर बौधिक मालमत्ता अधिकार यांचा समावेश आहे परंतु ते त्यापर्यंत मर्यादित नाहीत, आणि अशा अधिकारांचे सर्व पदवीहक्क केवळ NUANCE आणि/ किंवा त्यांचे परवाना देणाऱ्यांकडे राहतील. सॉफ्टवेअर किंवा सेवेच्या अनाधिकृत प्रती करणे, किंवा वरील निर्बंधांचे पालन नीट न करणे, यामुळे हा करार आणि त्यात दिलेले सर्व परवाने आपोआप संपुष्टात येतील, आणि त्यांचे उल्लंघन केल्याकारणे NUANCEला सर्व कायदेशीर आणि न्याय भरपाई उपलब्ध होईल.
3.2. तृतीय पक्ष सॉफ्टवेअर. या सॉफ्टवेअरमध्ये तृतीय पक्ष सॉफ्टवेअर असू शकते, ज्यासाठी सूचना आणि/ किंवा अतिरिक्त अटींची आणि शर्तींची गरज आहे. अशा आवश्यक तृतीय पक्ष सॉफ्टवेअर सूचना आणि/ किंवा अतिरिक्त अटी आणि शर्ती http://swype.com/attributions येथे दिल्या आहेत आणि त्यांचा संदर्भ देऊन त्या या कराराचा एक भाग आहेत आणि त्यात अंतर्भूत केल्या आहेत. या कराराचा स्वीकार करून, तुम्ही अतिरिक्त अटी आणि शर्ती, त्या दिल्या असल्या तर, देखील स्वीकारता.
3.3. स्पीच डेटा आणि लायसेंसिंग डेटा.
(अ) स्पीच डेटा. सेवेचा एक भाग म्हणून, स्पीच ओळख आणि सेवेचे इतर घटक, आणि NUANCEच्या इतर सेवा आणि उत्पादने जुळवण्याकरता, वाढवण्याकरता आणि सुधारण्याकरता NUANCE स्पीच डेटा, खाली व्याख्या केल्याप्रमाणे, संकलित करतात आणि वापरतात. या कराराच्या अटी आणि शर्ती स्वीकारून, तुम्ही स्वीकारता, संमती देता आणि मान्य करता की NUANCE सेवेचा एक भाग म्हणून स्पीच डेटा संकलित करू शकतात आणि स्पीच ओळख आणि सेवेचे इतर घटक, आणि NUANCEच्या इतर सेवा आणि उत्पादने जुळवण्याकरता, वाढवण्याकरता आणि सुधारण्याकरता अशी माहिती फक्त NUANCE किंवा NUANCE च्या अधिकाराखाली काम करणाऱ्या तृतीय पक्षांद्वारे, गोपनीयता करारांच्या अनुरोधाने, वापरली जाईल. वर दिलेल्या उद्देशाव्यतिरिक्त इतर कोणत्याही उद्देशाकरता कोणत्याही स्पीच डेटामधील माहितीचे भाग NUANCE वापरणार नाही. "स्पीच डेटा" म्हणजे तुम्ही त्याअधीन पुरवलेल्या किंवा सेवेशी संबंधित तयार केलेल्या ऑडियो फाईल्स, निगडित लेखी नकला आणि लॉग फाईल्स. तुम्ही पुरवलेला कोणताही आणि सर्व स्पीच डेटा गोपनीय राहील आणि गरज असल्यास, कायदेशीर किंवा नियामक आवश्यकता भागवण्याकरता, जसे की एखादा न्यायालयीन हुकुम, किंवा एखाद्या सरकारी संस्थेला गरज असल्यास किंवा कायद्याने अधिकृत केल्यास, किंवा NUANCEने दुसऱ्या संस्थेला विकल्यास, त्यांचे दुसऱ्या संस्थेत विलीनीकरण झाल्यास किंवा दुसऱ्या संस्थेने संपादन केल्यास, NUANCEद्वारे तो उघड केला जाऊ शकतो.
(ब) लायसेंसिंग डेटा. सॉफ्टवेअर आणि सेवेचा एक भाग म्हणून, NUANCE आणि त्यांचे पुरवठादार, खाली व्याख्या केल्याप्रमाणे, लायसेंसिंग डेटा देखील संकलित करतात आणि वापरतात. तुम्ही स्वीकारता, संमती देता आणि मान्य करता की सॉफ्टवेअर आणि सेवा पुरवण्याचा एक भाग म्हणून NUANCE लायसेंसिंग डेटा संकलित करू शकतात. लायसेंसिंग डेटा हा NUANCE किंवा NUANCEच्या अधिकाराखाली काम करणाऱ्या तृतीय पक्षांना, गोपनीयता करारांच्या अनुरोधाने, त्यांची उत्पादने आणि सेवा विकसित करण्यात, तयार करण्यात आणि सुधारण्यात मदत करण्याकरता वापरण्यात येतो. लायसेंसिंग डेटा वैयक्तिक नसलेली माहिती समजला जातो, कारण लायसेंसिंग डेटा एका अशा स्वरूपात असतो जो कोणत्याही विशिष्ट व्यक्तीशी प्रत्यक्ष संबंध ठेवण्याची परवानगी देत नाही. "लायसेंसिंग डेटा" म्हणजे सॉफ्टवेअर आणि तुमच्या उपकरणाविषयीची माहिती, उदाहरणार्थ: उपकरणाचा ब्रॅंड, मॉडेल क्रमांक, डिस्प्ले, उपकरणाचा आयडी [ओळख क्रमांक], आयपी पत्ता, आणि तत्सममाहिती.
(क) तुम्ही समजता की सॉफ्टवेअर आणि सेवेच्या तुमच्या वापराद्वारे तुम्ही, NUANCE आणि तृतीय पक्ष भागीदाराने साठवण्यासाठी, प्रक्रिया करण्यासाठी आणि वापरण्यासाठी युनायटेड स्टेट्स आणि/ किंवा इतर देशांना हस्तांतरित करण्याच्या समावेशासह, येथे दिल्याप्रमाणे स्पीच डेटा आणि लायसेंसिंग डेटाच्या संकलनाला आणि वापरण्याला संमती देता.
(ड) स्पीच डेटा आणि लायसेंसिंग डेटा NUANCEच्या लागू असलेल्या खाजगीयता धोरणाच्या अधीन आहेत. पुढील माहितीकरता, http://www.nuance.com/company/company-overview/company-policies/privacy-policies/index.htm.
4. मदत. सॉफ्टवेअर आणि सेवेच्या मूल्यांकनाची आणि चाचणीची प्रक्रिया जलद होण्यासाठी, परवानाधारक NUANCEचे फ्रीक्वेंट्ली आस्क्ड क्वेस्चन्स [वारंवार विचारले जाणारे प्रश्न] http://www.nuancemobilelife.comयेथे पाहू शकतात. अतिरिक्त मदतीसाठी, परवानाधारक अशा मदतीची आधी दिलेल्या संकेतस्थळाद्वारे विनंती करू शकतो, आणि NUANCEचा कर्मचारीवर्ग उपलब्ध असल्यास, NUANCE परवानाधारकाला फॅक्स, ईमेल किंवा इतर मार्गाने दोषासंबंधी योग्य मदत सेवा आणि/ किंवा सॉफ्टवेअर आणि सेवेची कार्ये आणि विशेष गुणांबद्दल स्पष्टीकरणे पुरवू शकतात. NUANCE सपोर्ट तुमच्या प्रश्नांची उत्तरे ४८ तासांच्या आत देईल (शनिवार-रविवार आणि कायदेशीर / कंपनीच्या सुट्ट्या सोडून).
5. हमींची जबाबदारी न घेणे. तुम्ही हे स्वीकारता आणि मान्य करता की NUANCE आणि त्यांचे परवाना देणारे आणि पुरवठादार सॉफ्टवेअर आणि सेवा तुम्हाला वापरणे शक्य करण्याकरता सॉफ्टवेअर आणि सेवा फक्त तुम्हाला पुरवत आहेत. परिणामी, तुम्ही तुमच्या डेटाचे आणि सिस्टिमचे गमावण्यापासून किंवा त्यांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक त्या सर्व खबरदाऱ्या आणि संरक्षण ठेवण्याचे मान्य करता. NUANCE, त्यांचे परवाना देणारे आणि पुरवठादार सॉफ्टवेअर आणि सेवा "जशी असेल तशी," सर्व दोषांसह, आणि कोणत्याही प्रकारच्या हमीविना पुरवतात. लागू असलेल्या कायद्याने परवानगी असलेल्या जास्तीत जास्त मर्यादेपर्यंत, NUANCE, त्यांचे परवाना देणारे आणि पुरवठादार, कोणतीही व्यापारी हमी, विशिष्ट कारणाकरता असलेली योग्यता, किंवा उल्लंघन न करणे याच्या समावेशासहित, कोणत्याही व्यक्त केलेल्या किंवा सूचित केलेल्या हमी स्पष्टपणे नाकारतात.
6. जबाबदारीची मर्यादा. लागू असलेल्या कायद्याने परवानगी असलेल्या जास्तीत जास्त मर्यादेपर्यंत, कोणत्याही घटनेत NUANCE, त्यांचे अधिकारी, मुख्य अधिकारी, आणि कर्मचारी, त्यांचे पुरवठादार किंवा परवाना देणारे, हे कोणत्याही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, विशेष, प्रासंगिक, आनुषंगिक किंवा अनुकरणीय नुकसान, नफा गमावण्याचे, माहिती गमावण्याचे, वापर गमावण्याचे, धंद्यात बाधा, किंवा भरून काढण्याची किंमत, सॉफ्टवेअर किंवा सेवा वापरण्यातून उद्भवलेल्या नुकसानाच्या समावेशासहित परंतु त्याच्या मर्यादेत नाही, मग ते कसे ही उद्भवले असले तरी, जबाबदारीच्या कोणत्याही सिद्धांताच्या अधीन, त्याचा आधीच सल्ला दिला असला तरी किंवा असे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे माहीत असावे असे असले तरी, यासाठी जबाबदार असणार नाहीत.
7. कालावधी आणि संपुष्टात येणे. हा करार तुम्ही या कराराच्या अटी आणि शर्ती स्वीकारल्यावर सुरू होतो आणि संपुष्टात आल्यावर संपतो. तुम्हाला सेवा संपल्याचे किंवा संपवण्यात आल्याचे कळवून NUANCE कोणत्याही वेळी त्यांच्या मर्जीप्रमाणे, कारणाने किंवा कारणाशिवाय हा करार, आणि/ किंवा त्याआधीन दिलेले परवाने संपवू शकतात. हा करार तुम्ही त्याच्या कोणत्याही अटी आणि शर्तींचे उल्लंघन केल्यावर आपोआप संपुष्टात येतो. करार संपल्यावर, तुम्ही सॉफ्टवेअर वापरणे लगेचच थांबवाल आणि त्याच्या सर्व प्रती काढून टाकाल.
8. निर्यातीसाठीची अनुसरता. तुम्ही लिहून देता आणि हमी देता की (i) तुम्ही अशा देशामध्ये स्थित नाही, जो यु.एस. सरकारच्या एखाद्या मनाई हुकुमाच्या अधीन आहे, किंवा ज्याला यु.एस. सरकारने "अतिरेक्यांना मदत करणारा" एक देश म्हणून दर्शावले आहे; आणि (ii) तुम्ही यु.एस. सरकारच्या प्रतिबंधित किंवा निर्बंधित पक्षांच्या कोणत्याही यादीमध्ये सूचीबद्ध नाही.
9. ट्रेडमार्क[व्यापारीचिन्हे]. सॉफ्टवेअर किंवा सेवेमध्ये असलेले किंवा वापरलेले तृतीय-पक्ष ट्रेडमार्क, व्यापारी नावे, उत्पादन नावे आणि लोगो ("ट्रेडमार्क") हे त्यांच्या त्यांच्या मालकांचे ट्रेडमार्क किंवा नोंदणीकृत ट्रेडमार्क आहेत, आणि असे ट्रेडमार्क वापरण्याचा फायदा ट्रेडमार्क मालकाचा असेल. असा ट्रेडमार्क वापरण्याचा उद्देश आंतरिकरित्या कामे करता येणे असा अर्थ सांगण्याचा आहे आणि त्यात खालील गोष्टी समाविष्ट नाहीत: (i) NUANCEची अशा कंपनीशी संलग्नता, किंवा (ii) अशा कंपनीची NUANCEला आणि त्यांच्या उत्पादनांना किंवा सेवांना मंजूरी किंवा मान्यता.
10. हुकमत असणारा कायदा. हा करार कॉमनवेल्थ ऑफ मॅसाचुसेट्स, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, यांच्या कायद्यांच्या, त्याच्या कायदे मतभेद तत्वांचा विचार न करता, अधीन असेल आणि याद्वारे या करारातून उद्भवणाऱ्या कोणत्याही वादाच्या संबंधात तुम्ही दिलेल्या कॉमनवेल्थमधील संघराज्य आणि राज्य न्यायालयांच्या संपूर्ण अधिकाराला शरण आहात. हा करार युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स फॉर द इन्टरनॅशनल सेल ऑफ गुड्स (United Nations Convention of Contracts for the International Sale of Goods)च्या अधीन नसेल, ज्याचा उपयोग इथे मुद्दम गाळला आहे.
11. बदल होऊ शकतील अशा अटी. तुम्ही हे स्वीकारता आणि मान्य करता की NUANCE या कराराच्या अटी आणि शर्ती तुमच्या ईमेल पत्त्याचा समावेश करून साईनअप करताना तुम्ही पुरवलेल्या पत्त्यावर योग्य सूचना देऊन वेळोवेळी बदलू शकतात. या करारातील असे बदल तुम्ही मान्य न केल्यास, तुमचा सॉफ्टवेअर आणि सेवा वापरणे बंद करणे हा एकमेव पर्याय आहे. तुमच्या आढाव्याकरता NUANCEने तुम्हाला दिलेल्या अशा बदलाच्या योग्य सूचनेनंतर ही तुम्ही सॉफ्टवेअर किंवा सेवेचा वापर सुरू ठेवल्यास तुम्ही असा बदल मान्य करत आहात असे समजले जाईल.
12. सर्वसाधारण कायदेशीर अटी. NUANCEच्या लेखी पूर्वसंमतीशिवाय तुम्ही या करारातील कोणतेही अधिकार किंवा जबाबदाऱ्या दुसऱ्याला देऊ शकत नाही किंवा अन्यथा हस्तांतरित करू शकत नाही. हा करार NUANCE आणि तुमच्यामधील संपूर्ण करार आहे आणि सॉफ्टवेअरच्या संबंधी असलेल्या कोणत्याही इतर संप्रेषणांच्या किंवा जाहीरातींच्या जागी आहे. या कराराची कोणतीही तरतूद अयोग्य किंवा लागू न करता येण्याजोगी झाल्यास, अशी तरतूद फक्त अयोग्य किंवा लागू न करता येण्याजोगी स्थिती नीट करण्याच्या मर्यादेपर्यंत सुधारली जाईल, आणि या कराराचा उर्वरित भाग संपूर्णतः प्रभावी आणि परिणामकारक राहील. या करारातील कोणताही अधिकार किंवा तरतूद वापरण्यात किंवा सक्ती करण्यात NUANCE अपयशी झाल्यास असा अधिकार किंवा तरतूद गमावली जाणार नाही. या कराराचे 2, 3, 5, 6, 7, 9, 10, and 12 हे विभाग हा करार संपल्यानंतर ही राहतील.